Date/Time:

अधिक बातम्या 

अधिक दर्शवा
जाहिरातीसाठी संपर्क  करा: बालाजी ढगे मोबाइल नं ७०२०६१९१८१  ९८९०३३८६९४


*राकाँचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज व अन्य जणांवर केले गुन्हे त्वरित माघे घ्या-युवानेते सुनील गुट्टे* _अन्यथा अन्याया विरोधात रस्त्यावर उतरु_

 
परळी प्रतिनिधी जलालपूर भागात साबळे कुटुंबातील पुरुषांसह महिला व लहान मुलावर झालेला भ्याड हल्ला व राकाँचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांच्यासह अन्य जणांवर अट्रोसिटी सारखे गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे राजकीय द्वेषाने दाखल करण्यात आले असून ते गुन्हे त्वरित माघे घ्यावे अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे एका निवदनाद्वारे राकाँ शरद पवार गटाचे युवा नेते सुनील गुट्टे यांनी केली आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांच्यावर झालेली खोटी अट्रोसिटीची घटना घडली त्यावेळेला लुगडे महाराज हे परळी पासून 40 किलोमीटर अंबाजोगाई तालुक्यातील गावात पक्षाच्या वतीने आयोजित शेतकरी संवाद यात्रेत होते याचा सगळा पुराव्यानिशी फुटेज मोबाईल लोकेशन हे पोलिसांना पुरावा म्हणून दिलेले असताना ही गुन्हा माघे घेण्यात आला नाही, कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या दबावापोटी पोलिस प्रशासन काम करत आहेत.विरोधी पक्षाच्या कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिकांवर परळी सर्रासपणे वेगवेगळ्या प्रकरणात खोटे गुन्हे दाखल करुन कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते आता सहन करणार नाहीत.साबळे कुटुंबातील पुरुषांसह महिला व लहान मुलावर झालेला भ्याड हल्ला व लुगडे महाराज, राधाकिसन साबळे व केशव साबळे यांच्यावर झालेली खोटी अट्रोसिटीच्या विरोधात हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा ही या निवेदनात युवानेते सुनील गुट्टे यांनी दिला आहे.

corona आतापर्यंत रुग्णांची संख्या click on image below