Date/Time:

अधिक बातम्या 

अधिक दर्शवा
जाहिरातीसाठी संपर्क  करा: बालाजी ढगे मोबाइल नं ७०२०६१९१८१  ९८९०३३८६९४


*ट्रक्टर व बैलगाडी मोर्च्यातुन शेतकऱ्यांचा आक्रोश* _शेतकरी संघर्ष समिती मोर्चा ठरला लक्षवेधी_


परळी / प्रतिनिधी
शेतकऱ्यांचा पिक विमा, अनुदान, कर्जमाफी व केंद्र व राज्य सरकारने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी (ता.२३) परळी उपविभागीय कार्यालयावर बैलगाडी व ट्रॅक्टर चा भव्य मोर्चा काढण्यात आला. पहिल्यांदाच बैलगाडी व ट्रॅक्टर मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी होत राज्याच्या कृषिमंत्र्याच्या मतदार संघातच बळीराजाने सरकार विरोधात एल्गार पुकारला.
 
यावेळी शेतकरी संघर्ष समितीचा घटक असलेल्या अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ.एड.अजय बुरांडे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करत शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी, शेतात पिकलेला आणि पडलेल्या भावामुळे घरात दोन वर्षांपासून असलेला सोयाबीन हे सरकार हमीभावाने खरचं सर्व सोयाबीन खरेदी करणार काय? इतर आश्वासनाप्रमाणे ही पण केवळ पोकळ घोषणाच ठरणार असा सवाल सरकारला केला, तर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर वाघमोडे यांनी संबोधित करताना सांगितले की,बीड जिल्ह्यातील जनतेने भरभरून प्रेम दिलेल्या आणि विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांबद्दल पोटतिडकीने बोलणारा व्यक्ती आज सुदैवाने कृषी मंत्री असून कृषीमंत्र्यांनी बळीराला न्याय देऊन त्याच्या प्रेमातून उतराई होण्याची संधी गमावू नये असे सांगितले.तर केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत शेतकरी हिताच्या घोषणा नकोय तर प्रत्यक्ष अंमलबजावणी करा अशी मागणी यावेळी शेतकरी नेते कालिदास आपेट तर शेतकऱ्यांना तातडीने मदत करा अशी मागणी अच्युत गंगणे यांनी केली.दरम्यान शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य नाही झाल्या तर वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या प्रसंगी जेष्ठ नेत्या सौ सुदामतीताई गुट्टे यांनी दिला असुन अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना कृषिमंत्र्याचं आश्वासन म्हणजे लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नाही सौ सुदामतीताई गुट्टे यांनी यावेळी असा अपोरक्त टोला ही लावला.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रलंबित पिक विमा,सोयाबीन खरीप पिक विमा, कापूस-सोयाबीन अनुदान, पासून वंचित आहे. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने वेगवेगळ्या अनुदानाच्या घोषणा केल्या जातात मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही.पीक विमा, हमीभाव, कर्जमुक्ती, यासह इतर मागण्याला घेत सोमवारी (ता.२३) शेतकरी संघर्ष समिती च्या वतीने परळी येथील उपविभागीय कार्यालयावर बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.शेकडो बैलगाड्या,ट्रॅक्टर आणि हातात लाल झेंडे घेऊन घोषणाबाजी करणारे शेतकरी यांचा मोर्चाला परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरातुन सुरुवात झाली. संत सेवालाल महाराज चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर, कृषी उत्पन्न बाजार समिती, एक मिनार चौक, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मौलाना अबुल कलाम आझाद चौक मार्गे सिंचन भवन समोरून उपविभागीय कार्यालयावर मोर्चा धडकला. 

या शेतकरी संघर्ष समितीचे घटक असलेल्या अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ.एड.अजय बुरांडे, शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट, सौ.सुदामतीताई गुट्टे,अच्युत गंगणे,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, राजेभाउ फड, राजेश देशमुख, उत्तमराव माने, युवानेते राजाभाऊ फड,किरणकाका पवार, सुनील रत्नाकर गुट्टे, एड.माधव जाधव, मच्छिंद्र जगताप, प्रभाकर वाघमोडे, कॉ. भगवान बडे, गंगाधर पोटभरे, एड.जीवनराव देशमुख कैलास सोळंके, आदींनी नेतृत्व केले. तहसील च्या प्रांगणात सुनील गुट्टे, राजेश देशमुख, राजेसाहेब देशमुख, , उत्तम माने आदी नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपस्थितांना संबोधित केले.यावेळी माकपचे कॉ पी एस घाडगे, कॉ पांडुरंग राठोड यांच्या सह विविध पक्ष व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

corona आतापर्यंत रुग्णांची संख्या click on image below